2019 मध्ये भारतीयांनी गूगलवर सर्वाधिक शोधल्या ‘या’ गोष्टी

इंटरनेटच्या माध्यमातून या गुगलने पाहता पाहता सर्वांच्या आयुष्य़ात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. पण तुम्हाला माहितीये का या गुगलला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? त्यातही भारतीयांकडून गुगलकडे कोणत्या प्रश्नांची सर्वाधिकी विचारणा होते याविषयी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? Googleकडून २०१९ या वर्षातील काही Trends जाहीर करण्यात आले आहेत.

Google Trendsनुसार यंदाच्या वर्षी ज्या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी गुगलवर शोधमोहिमा राबवल्या गेल्या त्यामध्ये पहिल्या स्थानावर होता क्रिकेट विश्वचषक Cricket World Cup. दुसऱ्या क्रमांकावर होती लोकसभा निवडणूक, तर तिसऱ्या क्रमांकावर होतं महत्त्वाकांक्षी चांद्रयान २. गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये चौथ्या क्रमांकावर अभिनेता शाहिद कपूर याचा चित्रपच ‘कबीर सिंग’ होता. तर पाचव्या क्रमांकावर हॉलिवूड चित्रपट Avengers-End Gameला स्थान मिळालं.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.