गूगलचा Paytm Appला जोर का झटका ; प्ले स्टोरवरुन App हटवलं

Google ने शुक्रवारी Google Play स्टोर वरुन पेटीएम App हटवलं आहे. गुगल कोणत्याही गँबलिंग ऐपचं समर्थन करत नाही. पेटीएमने नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण देत ही कार्रवाई केली आहे. Paytm आणि UPI ऐप One97 Communication Ltd. द्वारा डेवलप केला गेला आहे. Google Play Store वर पेटीएम सर्च केल्यास आता ते दिसत नाहीये. आधीच जर Android स्मार्टफोनमध्ये पेटीएम इंस्टॉल्ड असेल तर तो सुरु आहे.

Paytm पेमेंट सोडून Paytm for business, Paytm money, Paytm mall इत्यादी ऐप Google Play Store वर उपलब्ध आहेत.

गूगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही. जो युजर्सला दुसऱ्या साईटवर घेऊन जातो त्याचं देखील आम्ही समर्थन करत नाही. जर कोणता ऐप दुसऱ्या वेबसाईटवर ग्राहकाला घेऊन जात असेल आणि तेथे पैसे जिंकण्यासाठी कोणत्या टुर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी सांगत असेल तर ते आमच्या नियमांचं उल्लंघन आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.