Gopichand Padalkar | “जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल”; भाजप नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ
Gopichand Padalkar | सांगली : भाजपने आधी शिवसेना फोडली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव असल्याचं वक्तव्यं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं होत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक खळबळजनक विधान केलंय. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या घरावर येत्या काही दिवसात भाजपचा झेंडा फडकताना दिसेल, असं मोठं विधान केलं आहे. गोपीचंद पडळकर सांगली येथील एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. राष्ट्रवादीचे 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोकं म्हणतील आता भाजपमध्येच जाऊया.
त्यानंतर बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल. आता काही पुढं राहिलं नाही, असा दावाही त्यांनी केला. पडळकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे.
ते म्हणाले, गोपीचंद पडळकर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करत असतात. सुदैवाने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना राज्याचा, जिल्हाच्या आणि समाजाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करावं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चिंता करु नये. राष्ट्रवादीचं काम जनता गेली अनेक वर्ष पाहत आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांकडे लोकांन सांगायला स्वतचं कर्तृत्व नाही, त्यामुळे ते राष्ट्रवादीवर टीका करत राहतात. यातून त्यांनी किती प्रसिद्धी मिळवली हा चिंतनाचा विषय आहे, अशा शब्दांत महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Skoda Kushaq | Skoda Kushaq लवकरच दिसणार नव्या अवतारात
- Narayan Rane । “फोटोवर दुसरा कागद टाका आणि…”; ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेला राणेंचं प्रत्युत्तर
- Travel Guide | ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम Hills Station
- Kishori Pednekar | ‘मिलिंद नार्वेकरांनी दिल्या अमित शहांना शुभेच्छा’, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
- Nilesh Rane | “तुमचा उद्धव ठाकरे गेल्यानंतर…”, निलेश राणेंनी एकेरी भाषेत शिवसैनिकांना सुनावलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.