गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं; पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडा शर्यत संपन्न

सांगली : राज्यत बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत करण्यात आलं आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळत आहे. सांगली पोलिसांनी जंग जंग पछाडलेला नंतरही गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

यासोबतच ज्या शेतकऱ्यांची बैल शर्यतीत धावणार होती त्या मोजक्याच शेतकऱ्यांना या शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावर माळावर येऊन थांबले होते. सकाळी या ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि तीन वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली.

बैलगाडी शर्यतींवर न्यायालयानं बंदी घातली असूनही पडळकरांनी बैलांच्या संवर्धनासाठी, सरकारला जाग येण्यासाठी शर्यती भरवत असल्याचं जाहीर केलं होतं. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं कंबर कसली असतानाही आज अखेर गोपीचंद पडळकरांनी ही शर्यत पार पाडून दाखवली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा