‘महाविकासआघाडी सरकार राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र’

महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेले सरकार हे राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ टाकली. प्रशासनाची एबीसीडी माहीत नसलेल्या माणूस मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. कणवली येथील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

“28 नोव्हेंबरला शपथविधी झाला. आज 8 डिसेंबर आहे. तरीही अजून यांचं खातेवाटप होऊ शकलेलं नाही. खातेवाटपच काय पण अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. सध्या तीन पक्षांचे मिळून सरकार आलं आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवलं आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, ठप्प आहेत. हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नाही. कामं बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललं आहे. हे सरकार दीर्घ काळ चालणार नाही. हे काही महिन्याचं पाहुणं सरकार आहे, असंही राणे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.