Government Job Recruitment | भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेची Goverment Exam तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियाद्वारे केंद्र सरकार अनेक उमेदवारांना नोकरीची संधी Job Opportunity उपलब्ध करून देत आहे. भारत सरकार गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

भारतीय गुप्तचर विभाग यांच्यामार्फत विविध पदांच्या 1671 जागा

भारतीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 1671 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (SA/ Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/ जनरल (MTS/GEN) इत्यादी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी विविध पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. तरी या पदांच्या शैक्षणिक पात्रता बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय गुप्तचर विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.