सरकारी कार्यालये सात दिवसांसाठी बंद राहणार !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्वाचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पार पडला आहे. अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णालय , अग्निशमन विभाग इत्यादि वगळता सर्व सरकारी कार्यालयांना सात दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात मोठ्या शहरांमध्ये मॉल आणि थिएटर्स बंद ; पुण्यामध्ये शाळा,कॉलेजेसना सुट्टी !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये प्रशासन खबरदरीचे उपाय म्हणून अनेक उपाययोजना राबवत आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळून आले आहेत.

Loading...

उद्यापासून पुण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद !

मोठ्या शहरांमधील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने अगोदरच मोठ्या शहरांमध्ये कलम 144 लागू केले होते. तसेच राज्यातील सर्व शाळा , महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनासुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे अशी सूचना देण्यात आली होती. सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात येत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.