InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढू – मुनगंटीवार

डान्सबारसाठीच्या जाचक अटी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारने केलल्या कायद्यातील अनेक अटींचा आता उपयोग होणार नाही. टीकेची झोड उठताच सरकार ‘डॅमेज कंट्रोल’च्या प्रयत्नात लागलं आहे. डान्सबार बंदीसाठी सरकार अध्यादेश आणेन, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या अभ्यास करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधीमंडळात डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली आहे. यात कोणतंही पक्षीय राजकारण नव्हतं. कायद्यात कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे हे तपासले जाणार आहे. विधी आणि न्याय विभागाचे मत घेतले जाईल. गरज पडल्यास अध्यादेश काढू, मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी सांगितली.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.