InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १ हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ

- Advertisement -

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पूरग्रस्त भागातील १ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, कोसळलेल्या घरांसाठी अतिरिक्त मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, ऊस यासाठी घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम माफ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण त्याने कोणतीही कर्ज घेतलेले नसेले अशा शेतकऱ्याला देखील सरकार आर्थिक मदत करणार आहे, त्यासाठी तीनपट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

जवळजवळ बहुतांश शेतकऱ्यांना १ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा फायदा देण्याचा प्रयत्न करू, पंतप्रधान आवास योजनेतून ज्या घरांचे नुकसान झाले आहे. ती घरे बांधून देणार आहोत. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर १ लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहेत, अशी ही माहिती फडणवीस यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.