Government Scheme For Farmer | ‘हे’ क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांच्या जनावरांची घेईल काळजी, जाणून घ्या नक्की काय आहे योजना
Government Scheme For Farmer | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना (Government Scheme for Farmers) राबवत असते. कारण देशातील कृषीक्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानासह शेतकरी आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल करत आहे. अशा परिस्थितीत सरकार काही योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. त्याचबरोबर देशातील शेतकरी पशुसंवर्धन कार्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनेक शेतकरी शेती सोबतच पशुपालन देखील करतात. पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने पशुपालनासाठी क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या क्रेडिट कार्डचा वापर करून शेतकरी आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकतात.
पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. जनावरांच्या आजार, दुखापत, मृत्यू इत्यादी समस्यांसाठी या क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केंद्र सरकार पशुपालकांना तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी हमी द्यावी लागते. दरम्यान, शेतकरी 1.60 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज घेऊ शकतात. या क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी मत्स्य पालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन इत्यादी व्यवसायाला चालना देऊ शकतात.
केंद्र सरकारच्या पशु किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याज भरावे लागेल. यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यासाठी गेला, तर तुम्हाला 7 ते 9 टक्के व्याज भरावा लागतो. या योजनेमध्ये वेळेवर कर्ज भरल्यास केंद्र सरकार यावर तीन टक्क्यांनी सूट देते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फक्त चार टक्के व्याज द्यावा लागतो.
पशु किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अप्लाय करू शकतात. शेतकऱ्यांना या योजनेचा ऑफलाइन फॉर्म बँकेमध्ये मिळेल. फॉर्ममध्ये दिलेली माहिती व्यवस्थित पद्धतीने भरल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जाची प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण होते.
महत्वाच्या बातम्या
- Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल BCCI सचिव जय शाह यांनी दिली दिलासादायक माहिती, म्हणाले…
- Ather Electric Scooter | नवीन वर्षात ‘या’ दिवशी Ather लाँच करणार आहे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
- Skin Care Tips | ‘या’ बियांच्या वापराने चेहरा राहू शकतो निरोगी, जाऊन घ्या पद्धत
- Hyundai Creta Facelift | ‘या’ बदलांसह एप्रिल 2023 पर्यंत लाँच होऊ शकते Hyundai Creta Facelift
- Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने केली पोस्ट, म्हणाली…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.