Government Scheme for Farmers | सरकारच्या ‘या’ योजना शेतकऱ्यांना देतील भरपूर लाभ

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषी क्षेत्र मजबूत होत चालले आहे. चांगल्या पिकासाठी शेतकरी मेहनत घेतात. तर, दुसरीकडे सरकारही यामध्ये हातभार लावत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government Scheme) राबवत आहे. सरकारच्या या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणी पासून ते विक्रीपर्यंत मदत होते. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान, प्रोत्साहन, वैयक्तिक गरज, विमा इत्यादी प्रकारचे फायदे मिळतात. त्याचबरोबर या योजना शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी देतात. त्यातील काही योजना बद्दल जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना (Government Scheme)

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

‘प्रत्येक शेताला पाणी’ हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात आली आहे. पृथ्वीवरील सातत्याने कमी होणारे पाणी हे शेतकऱ्यांसाठी मोठ्या आव्हान बनले आहे. त्यामुळे ही समस्या लक्षात घेत केंद्र सरकारने कृषी सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांची पाण्याची समस्या दूर केली आहे. सध्या पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे शेतकरी थेंब थेंब सिंचन मॉडेलवर काम करत आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान देखील दिली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmksy.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

किसान क्रेडिट कार्ड योजना

शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणी पासून ते विक्री पर्यंत भरपूर खर्च करावा लागतो. दरम्यान, शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैसे संबंधित समस्यावर उपाय म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माफक व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कार्ड दिले जाते. यासोबतच कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी अनुदानही दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जवळची वित्तीय संस्था किंवा बँकेची संपर्क साधावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

मृदा आरोग्य कार्ड योजना

शेतकऱ्यांना मातीची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. कारण त्या मातीच्या माध्यमातूनच शेतकरी पिकं घेऊ शकतात. त्यामुळे मातीचे आरोग्य जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीतील मातीचे नमुने माती परीक्षण चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवू शकतात. प्रयोगशाळेमध्ये माती पाठवल्यानंतर शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी केले जाते. या कार्डमध्ये शेतकरी मातीची कमतरता, मातीची गरज, योग्य प्रमाणात मातीला लागणारे खत इत्यादी प्रकारची माहिती मिळू शकतात. शेतकरी मृदा आरोग्य कार्ड योजनेबद्दल अधिक माहितीसाठी dac.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.