InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सरकार राफेलच्या किंमतीची माहिती सुप्रीम कोर्टालाही देणार नाही…

सुप्रीम कोर्टाने दोन दिवसांपूर्वी राफेलच्या किंमतीची माहिती सरकारकडे मागितली होती. मात्र, कोर्टाच्या या आदेशानंतर काही तासांतच सरकारमधील एका वरिष्ठ सुत्राने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की,  ही अत्यंत गोपनिय माहिती असल्याने ती कोर्टालाही देण्यास सरकार असमर्थ आहे. त्यासाठी सरकारकडून कोर्टात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सांगितले होते की, राफेल जेटच्या किंमतींबाबत संसदेतही माहिती देण्यात आलेली नाही. यावर खंडपीठाने अॅटर्नी जनरल यांना सागितले की, जर ही माहिती इतकी विशेष असेल जी कोर्टालाही सांगता येत नसेल तर सरकारने कोर्टाला तसे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply