InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय पूजेला जाणार नाही – उद्धव ठाकरे

येत्या 17 जुलैला बीकेसीमधील विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेना महामोर्चा काढणार आहे. त्यामुळे आता  पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय पूजेला जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पीक विम्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक होतेय. त्या संदर्भात आम्ही विमा कंपन्यांना इशाराही दिला. परंतु आजही अनेक प्रकरणे पूर्ण झालेली नाहीत. सरकारी भाषेत त्यांना सांगून पाहिलं, आता शिवसेना स्टाईल मोर्चा निघेल, असा सज्जड इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विना कंपन्यांना दिला आहे.

शिवसेनेचा हा मोर्चा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असेल. दर वेळी शेतकरी मुंबईत मोर्चा घेऊन येतात. आता शिवसेना त्यांच्यासाठी महामोर्चा काढणार आहे. या योजनांमध्ये काही त्रृटी असतील तर त्यात सरकारमध्ये राहून सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply