InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

- Advertisement -

अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. अशी मागणी राज्यभरातील शेतकरी वर्ग करत आहे. अशातच आज राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे.

दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत देण्यात येणार आहे तर, फळबागांसाठी 18 हजारांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18000 रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Loading...

याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचित असा दिलासा दिला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे.

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.