फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

मुंबई : सध्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा गरम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रार केली होती. त्यामुळे राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी हा वाद आणखी वाढत चालला आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारपुढे आणखी एक चिंता उभी केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या एका निर्णयाला राज्यपालांनी केराची टोपली दाखवली आहे. आरोग्य विभागात 270 पदांची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मंत्रीमंडळाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात निवडणूका लागल्या. त्यावेळी आचारसंहितेच्या काळात यावर काहीच प्रक्रिया झाली नाही. ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर काही काळातच कोरोनाने थैमान घातलं. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यानंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे हा प्रस्ताव मंजुरीस आला होता, तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला आहे.

आरोग्य विभागात 270 पदांची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मंत्रीमंडळाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात निवडणूका लागल्या. त्यावेळी आचारसंहितेच्या काळात यावर काहीच प्रक्रिया झाली नाही. ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर काही काळातच कोरोनाने थैमान घातलं. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यानंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे हा प्रस्ताव मंजुरीस आला होता, तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा