राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अपमान करणं अपेक्षित नाही : जयंत पाटील

मुंबई : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झालीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. “शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली.

यानंतर राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अचंबित झाले. सत्ताधारी पक्षाने ‘राज्यपाल हटाव’ अशा घोषणा यावेळी दिल्या.

मात्र यानंतर यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. पाटील म्हणाले कि, ‘हेड ऑफ द स्टेट यांनी राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजी तो कार्यक्रमाचाच भाग असतो, आपलं भाषण कितीवेळ करायचं हा वेगळा भाग आहे. पण त्यानंतर भाषणाचा समारोप होऊन राष्ट्रगीतनंतर हा कार्यक्रम संपतो, पण या गोष्टीचं भान न ठेवता त्यांनी ताबडतोबीनं पायउतार होणं पत्करलं. याची जबाबदारी आज ठेवायची असेल तर, भाजपच्या सभागृहातल्या चूकीच्या वर्तनाकडेच त्याची जबाबदारी द्यावी लागेल, त्यांच्या मुळेच राज्यपालांना सभाग्रह सोडावं लागलं, पण राष्ट्रगीताचा अपमान करण अपेक्षित नाही. असे जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या