“राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी कोश्यारी बोलत होते.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

खासदार उदयनराजेंनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं, असं आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिलाय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या