Govinda Naam Mera | ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार विकी कौशल्यचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल (Vicky Koushal) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) मुळे चर्चा आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल एका दमदार पात्रात दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटासंबंधीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता विकी कौशल याने त्याच्या इंस्टाग्रामवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

अभिनेता विकी कौशल्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने त्याला कॅप्शन दिले आहे की,”गोविंदा नाम मेरा नाचना काम मेरा. माझी गोष्ट लवकरच येत आहे. 16 डिसेंबरला फक्त डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर.” या चित्रपटांमध्ये अभिनेता विकी कौशल्याच्या सोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील दिसणार आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित झाला असून हा चित्रपट चित्रपटगृहांनऐवजी ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटांमध्ये विकी कौशल एका डान्सरची भूमिका पार पडणार आहे. चित्रपटांमध्ये त्याला पत्नीशिवाय एक मैत्रीण देखील असणार आहे. या चित्रपटामध्ये गोविंदाची भूमिका करणारा विकी घर मिळवण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉलीवूड अभिनेता गोविंदाचा बायोपिक आहे, असे अनेकांना वाटत आहे. पण करण जोहरने एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की, ही गोविंदाची बायोपिक नसून एका डान्सरच्या संघर्षाची कथा आहे.

अभिनेता विकी कौशल पहिल्यांदाच अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणी (Kiara Adwani) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहते खूप खुश आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.