Govinda Naam Mera Trailer | कॉमेडी सस्पेन्ससह विकी कौशलच्या ‘गोविंदा मेरा नाम’चा ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल (Vicky Koushal) सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘गोविंदा मेरा नाम’ (Govinda Naam Mera) मुळे चर्चा आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल एका दमदार पात्रात दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये प्रेमाच्या त्रिकोणाचे नवीन स्वरूप आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते विकीच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून दर्शकांकडून त्याला उत्तम पसंती मिळाली आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसह अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pedanekar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘गोविंदा मेरा नाम’ (Govinda Naam Mera) ट्रेलर रिलीज

‘मेरा नाम गोविंदा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात विनोदी पद्धतीने होते. त्यानंतर हळूहळू चित्रपटाचा ट्रेलर गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. तर ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्यामध्ये काही विनोदी प्रसंग दाखविले आहेत. या चित्रपटामध्ये प्रेमाचे अनोखे त्रिकूट बघायला मिळणार आहे. चित्रपटांमध्ये भूमी आणि विकी पती-पत्नीच्या भूमिकेमध्ये दाखवले आहे. तर, दुसरीकडे विकी कियारा सोबत देखील रोमान्स करताना दिसून आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर असे लक्षात येत आहे की हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे.

‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शशांक खैतान यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे. या चित्रपटाद्वारे विकी कौशल भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

हा चित्रपट बॉलीवूड अभिनेता गोविंदाचा बायोपिक आहे, असे अनेकांना वाटत आहे. पण करण जोहरने नुकताच एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की, हा गोविंदाचा बायोपिक नसून एका डान्सरच्या संघर्षाची कथा आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.