Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शासकीय विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत (Departments of Food and Drug Administration) रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) अन्न सुरक्षा अधिकारी (गट-ब) (राजपत्रित) पदांच्या एकूण 189 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Govt Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे-1 कार्यासन) 9 वा मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400002.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Xr5l4ME-RHXfWaP4YZ7Fq68cyT9ZsQuq/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://fdamfg.maharashtra.gov.in//

महत्वाच्या बातम्या