सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय, विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास, रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई : राज्य सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवली असून विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने ती यादी तातडीने मंजूर करतील असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरु असं जाहीर केलं होतं. यावरुन एका युजर्सने ट्विट करुन प्रश्न उपस्थित केला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने ३१ जुलै च्या आधी MPSC आयोगातील सदस्य भरणार होते, काय झालं? असं सवाल विचारणारं ट्विट केलं. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरं देणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं. ज्यातून ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

माननीय अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा