Grampanchayat Election 2022 | संदीपान भुमरेंना मोठा धक्का! सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचा मोठा विजय
Grampanchayat Election 2022 | औरंगाबाद : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान पार पडलं. मंगळवार २० डिसेंबरला या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले. दरम्यान आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.
आमदार संदिपान भुमरे यांनी स्वत: सरपंच पदाचे उमेदवार बबन नाना ठाणगे यांना मतदान करण्याते आवाहन केले होते. मात्र तरी देखील त्यांचा सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. त्यामुळे भुमरे यांची चांगलीच फजिती झाली आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची गावं मानली जातात. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा बिडकीनमध्ये पराभव झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार अशोक धर्मे यांचा सरपंचपदी विजय झाला आहे.
१८ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या बिडकीनमध्ये यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी चांगलाच जोर लावला होता. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी पॅनल उभं केलं होतं. अटीतटीच्या लढाईत बिडकीन ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली असून सरपंचपदासाठी अशोक धर्मे यांचा १२०० मतांनी विजय झाला आहे. त्यामुळं मंत्री संदीपान भुमरेंना स्वत:च्याच तालुक्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | कर्नाटकला आक्रमकपणे ‘जशास तसे’ उत्तर द्या – अजित पवार
- Sanjay Raut | उपमुख्यमंत्री वकीली का करतात, ११० कोटीमध्ये वाटणी आहे का? ; संजय राऊतांचा सवाल
- Winter Session 2022 | “मुंबई सोन्याची कोंबडी आहे म्हणत होते पण…” ; छगन भुजबळांचे विधानसभेत भाषण
- Winter Session 2022 | फोटो मॉर्फिंगवरुन विधानसभेत गोंधळ, भाजप राष्ट्रवादी आमने-सामने
- Winter Session 2022 | विधानसभेत सत्ताधारी मंत्रीच नाहीत, प्रश्न विचारणार कुणाला? अजित पवार संतापले
Comments are closed.