InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“पोरी, आमचं सगळं गेले गं…”; आजींनी आपल्या भावना शर्मिला ठाकरेंकडे केल्या व्यक्त

- Advertisement -

शर्मिला ठाकरे सध्या या पूरग्रस्त पाहणी करण्यासाठी सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी त्या या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट दिली. शर्मिला ठाकरे यांनी गावातील लोकांची भेट घेतली. त्यावेळी “पोरी, आमचं सगळं गेले गं…” असं म्हणून आजींनी आपल्या भावना सौ. शर्मिला ठाकरेंकडे मोकळ्या केल्या.

- Advertisement -

पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून पूरग्रस्त भागात मदत करत आहेत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारला हात जोडून विनंती आहे की, पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू सगळेच मिळून देत आहोत. अनेकांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र पुरामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांचे घर उभारण्यात सरकारने हातभार लावावा असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.