दूख:द : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती.

सोशल मिडियावर चर्चा आहे विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची , वाचा काय आहे प्रकरण
16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले होते. पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.

बकरी ईदसाठी मशीद उघडण्याची ‘या’ खासदाराची मागणी ; पालिका आयुक्तांनी दिला नकार

निलंगेकर यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह निलंगा येथे आणला जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.