GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL 2023 Final | अहमदाबाद : सध्या एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होत आहे. काल ( 28 मे ) IPL 2023 मधील फायनल मॅच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) आयोजित करण्यात आला होता. परंतु, पावसामुळे ही मॅच आज ( 29 मे) त्याच स्टेडियममध्ये रात्री 7वाजता सुरू होणार आहे. तर गुजरात टायटन्स ( GT) आणि चेन्नई सुपर किंग्स ( CSK) या दोन टीम्समध्ये IPL 2023 चा अंतिम सामना होणार आहे. तर काल एक वेगळीच घटना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

स्टेडियममध्ये महिलेने उचलला पोलिसावर हात-

तसचं त्या स्टेडियममध्ये पाऊस पडत होता. तर दुसऱ्या बाजूला चक्क एका महिलेने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसावर हात उचलत त्याच्या कानाखाली मारली. याचप्रमाणे सतत ती महिला त्याला ढकलत होती. तो पोलीस ( Police) पुन्हा उठून चालत होता तर ती महिला पुन्हा त्याच्या अंगावर जात होती. शेवटी तो पोलीस तिथून निघून गेला. असा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/TheNaziLad/status/1662829681169817602

female fan slaps a police officer in narendra modi stadium

दरम्यान, हा व्हिडिओ टि्वटरवर शेयर केला असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या महिलेवर कठोर कारवाई करावी, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत. तर आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांना त्याठिकाणी नेमल जात यामुळे असा प्रकार त्याच्यासोबत होणं म्हणजे पोलिसाचा अपमान आहे. यामुळे लवकरात- लवकर कारवाई व्हावी अश्या प्रतिक्रिया देखील या प्रकरणी येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WI2vZY

You might also like

Comments are closed.