GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

GT vs MI | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. काल अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. क्वालिफायर 2 सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबईला 62 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात विजय मिळवत गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे.

गुजरात आणि मुंबई (GT vs MI) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये शुभमन गिल (Shubman Gill) ने तुफानी खेळी खेळली. कालच्या सामन्यामध्ये गिलने हंगामातील तिसरे शतक ठोकले. या सामन्यात मुंबई इंडियन्सला शुभमन गिलला जीवनदान देणे खूप महागात पडले.

In the GT vs MI match ‘this’ small mistake cost Mumbai the loss

शुभमन गिल फलंदाजी करत असताना त्याला आऊट करण्याची संधी मिळाली होती. गिल फलंदाजी करत असताना सहावे षटक  टाकण्यासाठी ख्रिज जॉर्डन मैदानावर (GT vs MI) आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर गिलले मिड-ऑन दिशेकडे शॉट मारला होता. त्यावेळी गिलला बाद करण्याची संधी चालून आली होती. मात्र, क्षेत्ररक्षण करत असलेल्या टीम डेव्हिडकडून तो सोपा झेल सुटला. टीम डेव्हिडने तो झेल घेतला असता, तर गिलला 129 धावा करता आल्या नसत्या.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. उद्या (28 मे) हा रोमांचक अंतिम सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WDWP2V