Gujarat Election | गुजरात निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ‘इतके’ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष

Gujarat Election | नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा (Gujarat Election) निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशातच निवडणूकीचा दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज ५ डिसेंबर रोजी पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८.५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान झालं आहे. 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं.

दरम्यान, अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या विधानसभा मतदारसंघांमध्ये 61 राजकीय पक्षांचे एकूण 833 उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

दुसऱ्या टप्प्यात अहमदाबादमध्ये सर्वात कमी ५३.१६ टक्के मतदान झाले. साबरकांठा येथे सर्वाधिक ६५.८४ टक्के झाले आहेत. हिमाचलसह गुजरात निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबरला जाहीर होतील.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.