Gujarat Election Results | विरमगाममधून हार्दिक पटेल विजयी! काँग्रेस उमेदवाराची तिसऱ्या क्रमांकावर घसरण

Gujarat Election Results | गुजरात विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतमविरमगाम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना एकूण 73786 मते मिळाली, तर ‘आप’चे अमरसिंह ठाकोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ठाकोर यांना 39,135 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार लखाभाई भिखाभाई भारवाड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 28,634 मते मिळाली.

गुजरातमध्ये भाजपच्या दणदणीत विजयाचे श्रेय हार्दिक पटेलने भाजपच्या कामाला दिले आहे. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीरमधून 2019 मध्ये हटवण्यात आलेले कलम 370 चा उल्लेख केला. हा भाजपच्या कामाचा विजय असल्याते त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भिखाभाई भारवाड यांच्याशी पहिली निवडणूक लढवली. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आम आदमी पक्षाने येथून अमरसिंह ठाकोर यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक तिरंगी झाली.

गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाने देखील ताकदीने ही निवडणूक लढवली. त्यामुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली.

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.