InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गुजरातच्या सूरत येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 21 मुलांचा मृत्यू

- Advertisement -

गुजरातमधील सुरत येथे एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.  20 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याचा इमारतीमधून उडी मारल्याने अंत झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्या 11 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरू असतानाचा आग लागली.

- Advertisement -

आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, गुजरात सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.