InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

२७ जानेवारीला हार्दिकच्या लग्नाचा धुमधडाका

पाटीदार समाजा नेता हार्दिक पटेल याच्या विवाहसोहळ्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. २७ जानेवारी रोजी हार्दिक विवाहबंधनात अडकणार आहे. बालपणीची मैत्रीण किंजल पारेख हिच्यासोबत हार्दिक लग्नाच्या बेडीत अडकणार असून, वडील भारत पटेल यांनी त्याच्या लग्नाच्या वृत्तास दुजोरा दिला.

किंजल आणि हार्दिक यांच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. हार्दिक २५ वर्षांचा असून, किंजल त्याच्याहून दोन वर्षांनी लहान आहे. अहमदाबादच्या चंदन नगरी या गावातील एकाच भागामध्ये हे दोघंही राहातात.

किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती वकिलीचं शिक्षण घेत आहे. हार्दिकचा विवाहसोहळा सुरेंद्रनगर जिल्ह्यातील येथील दिगसार या गावात पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.