मोदींकडून गुल पनागच्या मुलाचं कौतुक, शेअर केला व्हिडिओ

- Advertisement -
भारताचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले सोशल मीडियावर सक्रिय असलेले पंतप्रधान आहेत. सोशल मीडिया हे एकमेकांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयोगी असे माध्यम असल्याच मोदी मानतात. त्यांचे आतापर्यंत कलाविश्वातील लोकांशी असलेले संबंध बघून सामान्य नागरिक आश्चर्यचकीत होतात.
नुकताच, अभिनेत्री गुल पनागने तिच्या मुलगा निहालचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये गुलपनागचा मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॅगझिनच्या कव्हरपेजवर ओळखतो. या व्हिडिओत गुल पनाग निहालला विचारते की, या मॅगझिनच्या कव्हरपेजवर कोण आहे? तेव्हा थोडाही विलंब न करता निहाल उत्तर देतो, ‘मोदी’. तेव्हा गुलपनाग त्याला बरोबर करते आणि म्हणते ‘मोदी जी’. ही पोस्ट गुल पनाग ट्विटरवर शेअर करते.
Loading...
Related Posts
Extremely adorable!
Do convey my blessings to young Nihal. Wishing him the very best, in whatever he seeks to do. I am also sure he will find an amazing mentor and guide in you, @GulPanag. https://t.co/CQN5hMPg7Z
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2019
- Advertisement -
Loading...
महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदर व्हिडिओवर प्रतिक्रिया केली आहे. आज सकाळीच गुल पनागने हा व्हिडिओ शेअर केला असून मोदींनी निहालला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या प्रचारात व्यस्त आहेत. 21 ऑक्टोबर रोजी असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. असं असताना त्यांनी गुल पनागला दिलेलं उत्तर सगळ्यांनाच थक्क करणार आहे.
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन @inshortsmarathi https://t.co/EqKlj3KSc1
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 17, 2019