Gulabrao Patil | “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Gulabrao Patil | जळगाव : साडेतीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी 10 आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे तब्बल 50 आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. या संदर्भात शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
“आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. “असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”, असंदेखील ते म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, “उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता.” यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले.
दरम्यान, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्यावर विरोधकांकडून सतत कुरघोड्या केल्या जातात. मी शांतपणे काम करणारा माणूस आहे. मी माझे पालकमंत्रीपद आणि सरकार अजून कोणाला दाखविले नाही. जर मी दाखवले, तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Reels | खोट्या बंदुकीसोबत रिल्स बनवणे पडेल महागात; होऊ शकते ५ वर्षाची शिक्षा
- Rohit Pawar | “छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची…”; राज्यपालांच्या विधानावर रोहित पवार संतापले
- Amol Mitkari | “पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि…”; राज्यपालांच्या विधानावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया
- Heart Care Tips | हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- MNS | “कोश्यारी नावाचं पार्सल…”; भगतसिंह कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत मनसे आक्रमक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.