Gulabrao Patil | गद्दारी करायची असती तर राज ठाकरे आणि राणेंसोबतच गेलो असतो – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil | पंढरपूर: काल (20 जून) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गटाकडून कालचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे गद्दर आणि खोके सोडून दुसरा मुद्दाच नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

The Thackeray group has no other issue than traitors and boxes – Gulabrao Patil

गुलाबराव पाटील (Gulabarao Patil) म्हणाले, “ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्याकडे गद्दर आणि खोके सोडून दुसरा मुद्दा नाही. आम्हाला जर गद्दारी करायची असती तर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणे (Narayan Rane) गेले तेव्हाच आम्ही पण गेलो असतो. तेव्हा देखील आम्हाला ऑफर दिल्या होत्या.”

पुढे बोलताना ते (Gulabrao Patil) म्हणाले, “आम्हाला जर गद्दारीच करायची असती तर आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेलो असतो. आम्ही शिवसेना कधीच सोडली नसती. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत तुमचं आय लव यू आणि आमची गद्दारी का?”

यावेळी बोलत असताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत आमच्या सारख्या लोकनेत्यांच्या तुकड्यावर मोठा झालेला माणूस आहे. राऊतांनी फक्त महानगरपालिका निवडणुकीत उभे राहून निवडून दाखवावं. ”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/gulabrao-patil-said-if-he-wanted-to-commit-treason-he-would-have-gone-with-raj-thackeray-and-rane/?feed_id=45383