Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना थेट इशारा ; म्हणाले…
Gulabrao Patil | जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतरांनंतर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत चालू असल्याचं पहायला मिळत आहे. आगामी निवडणूकांसाठी सर्व पक्ष रणनीती आखत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप देखील एकमेकांवर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांनी आपला पक्ष भक्कम करण्याकडे लक्ष दिलं असून महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रित सभा आणि दौरे सुरू केले आहेत. तर 23 एप्रिलला उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ( Sanjay Raut) जळगावमध्ये येणार आहेत. यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. तर राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
यांनी संजय राऊतांना इशारा दिलाय.
काय म्हणाले गुलाबराव पाटील (What did Gulabrao Patil say)
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला. पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण त्यांनी चौकटीत बोलावं. विशेष म्हणजे संजय राऊत सारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर मी सभेत घुसेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी म्हटलं उद्धव ठाकरे आणि माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांचे संबंध चांगले आहेत यामुळे हे याठिकाणी येणार आहेत त्याचं स्वागत आहे. असं देखील म्हणाले. तसचं याआधी देखील गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर टीका टिप्पणीची चांगलीच जुगलबंदी झाली होती. पुन्हा आता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | हवामानात होणार पुन्हा मोठा बदल! पंजाबराव डख यांनी व्यक्त केला अंदाज
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा
- Union Bank Of India | युनियन बँकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Comments are closed.