Gulabrao Patil | “…तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सत्ता स्थापन केली असती” ; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
Gulabrao Patil | जळगाव : शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपसोबत सत्ता स्थापन केली असती, असे वक्तव्य शिंदे गटातील नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी देखील पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती, असे पाटील म्हणाले.
सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो तेव्हा राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली होती. कदाचित एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाताना दिसली असती, असे गुलाबराव पाटील म्हणाले. शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे, यावर गुलाबराव पाटील बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराचा पहिला दिवस संपन्न झाला. शिर्डी येथे हे शिबिर सुरु आहेत. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे गटावर टीका करत आहेत. या शिबिरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावा करण्यात येत आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अधिवेशन संपले. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जातात”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Indian Post Recruitment | भारतीय डाक विभागात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Deepak Kesarkar | “आधी तुमच्या घरात लागलेली आग विझवा” ; दीपक केसरकरांचा अजित पवारांवर पलटवार
- Amol Mitkari | एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या ‘त्या’ भेटीवरून अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…
- Elon Musk | ट्वीटरचा ताबा घेताच एलन मस्कने कंपनीतून काढले निम्मे कर्मचारी
- Nitin Gadkari | “कारण नसताना लोक…”, प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने होणाऱ्या टीकांवर नितीन गडकरी कडाडले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.