Gulabrao Patil | “…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

नंदुरबार : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ होत चाललं आहे. सतत सत्ताधरी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

नंदुरबामध्ये दौऱ्यावर असताना गुलाबराव पाटील बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकारने जर ठाकरे सरकारच्या तुलनेत पाचपट अधिक कामं केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

शिंदे गटातील आमदार नाराज असून यातील 22 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, शिंदे-फडणवीस सरकारबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. शिंदे गटातील 40 पैकी 22 आमदार आमच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार नाराज आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पण माझं त्यांना आव्हान आहे की, संपर्कात असलेली व्यक्ती आहे? त्याला व्यासपीठावर उभं करावं, असं पाटलांनी म्हटलं आहे.

तसेच, पुढे बोलताना मागील महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि आमचे 90 दिवस याचा विरोधकांनी हिशोब लावावा. तुमच्यापेक्षा पाचपट कामं जर या सरकारने केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं आव्हानही पाटलांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.