Gulabrao Patil | “ताई कशी काय बोलते गं, थोडी लाज…”; गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका

Gulabrao Patil | जळगाव : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अंधारे यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, “ताई कशी काय बोलते ग देवांवर.. थोडी लाज शरम ठेव.” अंधारे यांना मी म्हणालेला नटी शब्द हा वाईट नव्हता, माझ्या मनात पाप नव्हतं मी भावनेच्या आहारी बोललो होतो, असं देखील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यावेळी बोलताना म्हणाले. महापुरुषांवर देवधर्मावर व साधुसंतांवर टीका करत आहेत हे पाप भरावा लागेल, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यातही असंच सुरू राहणार असून विठ्ठल, रुक्मिणी, देवधर्म, हिंदुत्व, साधुसंत व छत्रपतींवर टीका करणारे किती चांगले वक्ते त्यांच्याकडे असल्याचा टोला लगावत त्यांच्याकडे लोक कसे राहतील? असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला आहे.

दरम्यान, यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. पुढे त्या म्हणतात, शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.