Gulabrao Patil | महिला शिवसैनिकांकडून गुलाबराव पाटलांच्या पोस्टरला चप्पलांचा मार, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन
Gulabrao Patil | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि बाळासहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांच्यात चांगलाच वाद तापला आहे. अशातच अंधारेंवर टीका करत असताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली. यावरुन महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.
शिवसेना भवनाबाहेर महिला शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांच्या पोस्टरला चप्पलांचा मार दिला आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सेनाभवन बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत गुलाबराव पाटील यांचा निषेध केला.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभा रद्द केल्याच्या वादावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “हा विषय माध्यमांनी तापवला. आम्ही तापवला नाही, एखाद्या राष्ट्रपतीप्रमाणे त्यांच्या सभा या सर्व माध्यमांनी लाईव्ह दाखवल्या. लोकमान्य लोकांना एवढं महत्त्व देत नाही तेवढं महत्त्व त्यांना दिले.”
सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची बोचरी टीका पाटलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | ‘सत्तेत असताना झोपा काढल्या अन् सत्त गेल्यावर…’, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स
- BJP-ShivSena alliance | गरज पडली तर पारंपारीक मित्र शिवसेनेसोबत जाऊ ; भाजप नेत्याचे मोठे विधान
- T20 World Cup | टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनल आणि सेमीफायनल दरम्यान पाऊस पडल्यास अशा पद्धतीने ठरेल विजेता
- BJP vs MNS | “लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती कशाला” ; भाजपच्या मोठ्या नेत्याचा विरोध
- Raj Thackeray | राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड मान्य आहे का?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.