Gulabrao Patil | “… म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडलं”; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण
Gulabrao Patil | जळगाव: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्या मागचं कारण सांगितलं आहे. माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता, असं म्हणतं गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता. जळगाव जिल्ह्यामध्ये पाच आमदार होते, त्यापैकी चार माझ्या आधी पळून गेले होते. नंतर मी एकटा राहिलो होतो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशा जहरी टीका करण्यात आल्या. मी जर चुकीचा निर्णय घेतला असता तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपल्या मतदारसंघात एवढी कामं झाली नसती.”
“नागपूर, बुलढाणा, नाशिक, ठाणे, दादर या ठिकाणचे आमदार गेले होते. मी आजूबाजूला नजर मारली, तर मी एकटाच राहिलो होतो. मी एकटा काय करणार होतो? मी जर गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का?”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप
- Ajit Pawar | “सोशल मीडियावर व्हायरल क्लिपमुळे…” ; महाराष्ट्रात झालेल्या दंगलीप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | “या दंगली जाणीवपूर्वक…” ; महाराष्ट्र दंगली प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल
- Sanjay Raut | मी कारवाईला घाबरत नाही; नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांचं ट्विट
Comments are closed.