Gulabrao Patil | “राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेलं पार्सल उरली सुरली शिवसेना संपवेल”; गुलाबराव पाटलांचा निशाणा कुणावर?

Gulabrao Patil | जळगाव :  शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटासोबतच भाजपाला देखील चांगलंच फैलावर घेतलं आहे. सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे मंत्री गुलबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे सध्या जळगावमध्ये आहेत. दरम्यान जळगावमध्ये अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी पाठवलं आहे. हे राष्ट्रवादीतून आलेले प्रॉडक्ट आहे. आधीच राष्ट्रवादीने शिवसेना संपवली आहे शिल्लक आहे ते संपवण्यासाठी राष्ट्रवादीतून आलेलं हे पार्सल आहे, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाप्रबोधन यात्रेतून पक्षाची भूमिका मांडणे अपेक्षित असते मात्र ही महाप्रबोधन यात्रा नसून ज्या सभा झाल्या त्या जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. माझी जात काढली गेली, माझ्या आई वडिलांवर बोलल गेलं, मुख्यमंत्र्यांचा मराठा समाजाबद्दलही आक्षेपार्ह्य वक्तव्य या सभांमधून करण्यात आले. “अशा पार्सल पासून सावध राहा तुमचा पक्ष डब्यात नेल्याशिवाय ते राहणार नाही”, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधला.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि माझी संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि त्यांची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. तसेच ५० मिटरच्या आता दोघांना परवानगी असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपींनी विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत. पाटलांच्या या वक्तव्याला सुषमा अंधारे काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.