Gulabrao Patil | “सकाळी एकासोबत शपथ घेतात, संध्याकाळी दुसऱ्यासोबत जातात, अशांनी…”; गुलाबरावांची अजित पवारांना कोपरखळी

Gulabrao Patil | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली आहे.

‘उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही नेता पुन्हा निवडून येणार नाही’, अशी टीका अजित पवारांनी केली होती. अजित पवार यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.

“सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात संध्याकाळी कुणाबरोबर”-Gulabrao Patil

“शेवटी जनता हुशार आहे. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, ते कितपत लागू होतं, हे त्यांनीच तपासून बघावं. हे सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर जातात. तिसऱ्या दिवशी कुणाबरोबर सरकारमध्ये बसतात. अशांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही”, असा टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.

ठाकरेंना सोडून गेलेल्यांपैकी एकही आमदार निवडणून येणार नाही- Ajit Pawar

“जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आहेत. त्यातील एकही आमदार निवडून येत नाही. नारायण राणेंनी शिवसेना फोडली होती. सगळे बाहेर पडले. त्यानंतर राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. मुंबईत तर त्यांना एका महिलेनं पाडलं. एका बाईनं पाडलं नारायण राणेंना”, अशी खोचक टीका अजित पवारांनी केली होती. अजित पवारांच्या याच टीकेला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.