Gulabrao Patil | “सुषमा अंधारे बाई आहेत, माणूस असता तर दाखवलं असतं”, गुलाबराव पाटलांचा आक्रमक पलटवार!

Gulabrao Patil | जळगाव : थोडी फार उरलेली शिवसेना (Shivsena) वाढवण्याचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेरची भूत आणून शिवसेना वाढणार नाही, असे म्हणत नाव न घेता गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)  यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना लगावला. यावेळी गुलाबराव पाटील आक्रमक झाले. त्यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर चांगलाच पलटवार केला. गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे.

सुषमा अंधारे  (Sushma Andhare) यांच्या सभा रद्द केल्याच्या वादावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “हा विषय माध्यमांनी तापवला. आम्ही तापवला नाही, एखाद्या राष्ट्रपतीप्रमाणे त्यांच्या सभा या सर्व माध्यमांनी लाईव्ह दाखवल्या. लोकमान्य लोकांना एवढं महत्त्व देत नाही तेवढं महत्त्व त्यांना दिले.”

तर धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती-

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची सभा होऊ न देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दबाव टाकला, असा आरोप झाला होता. यावर पाटील म्हणाले, “आम्ही दबाव टाकला असता तर सुषमा अंधारे यांची धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती. मुक्ताईनगरमध्ये माझी सभा होती. त्या सभेसाठी आम्ही आधी परवानगी मागितली होती आणि ती मिळाली सुद्धा होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती. त्यासाठी दोन्ही सभा रद्द केल्या. त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही.”

मुक्ताईनगरमध्ये परवानगी नाकारल्यानंतर सभा घेणारच असा इव्हेंट केला आणि मी कशी महाराणी आहे अस चित्र त्यांनी निर्माण केलं, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.

हे कुठेचं वसारलेले भांड होत-

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनता दलाचे उदाहरण दिलं. परवानगी नसल्याने जनता दलाचे आमदारांनी झाडावर बसून सभा घेतली होती., त्याचप्रमाणे यांनीही कुठेतरी बसून सभा घ्यायला पाहिजे होते,  हे नाटक आहे. नौटंकी आहे, हे कुठेचं वसारलेले भांड होत, हे आता इकडे आले आणि आम्हाला शिकवत आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंनी पिक्चरमध्ये या बाईला आणलं- 

सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांचे वाळूचे ठेके गावठी दारूचे अड्डे तसेच दोन नंबरचा पैसा आहे असे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मला माझा जिल्हा ओळखतो त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चर मध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला.

सुषमा अंधारे बाई आहेत, माणूस असता तर दाखवलं असतं – 

देवेंद्रजी यांचा अभय असल्यामुळे मंत्री गुलाब पाटील यांनी माझी सभा होऊ दिली नाही. फडणवीस यांचा अभय नसता तर गुलाबराव पाटील यांची हिम्मत झाली नसती, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. ४० आमदारामध्ये मला फक्त राज्यात गुलाबराव पाटीलच दिसतोय. मात्र हा एकटा वाघ सर्वांना काफी आहे, माझी स्टाईल कॉपी करायला सुषमा अंधारेंना अनेक जन्म घ्याव लागतील, सुषमा अंधारे बाई आहेत. माणूस असता तर दाखवलं असतं गुलाबराव पाटील कोण आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.