Gulabrao Patil । “आम्ही ठाकरेंना सांगितले की, आपले ज्याच्यांशी लफडे होते त्यांना समजवा आणि पुन्हा एकत्र या”

Gulabrao Patil । औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मात्र हे सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत आहेत. आज सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित सभा होती. या सभेला कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या तीन मंत्र्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. या सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान भाषण करत चौफेर फटकेबाजी केली.

काय म्हणाले गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले कि, मागच्या काळात अडीच वर्षांपूर्व रावसाहेब दानवे आणि आमचं लव्ह मॅरीज तुटलं. त्यावेळी माझ्याकडं पाणीपुरवठा खातं होतं. पण, केंद्रात आणि राज्यात वेगवेगळी सत्ता होती. जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली. 700 ते 800 कोटी रुपयांचा बजेट असायचा.आता 34 हजार गावांना पाणी पाजायला दिली आहे. 30 हजार गावांचे डीपीआर तयार झाली आहेत. 22 हजार गावांच्या वर्क ऑर्डर देण्याच्या तयारीत आहोत. प्रत्यक्षात 10 हजार गावांच्या कामांची सुरुवात झाली आहे. एकट्या संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2,70,069 कोटी रुपये आपण पाणीपुरवठ्याकरिता मंजूर केले आहेत.

शाळेचे दप्तर हाती होते तेव्हापासून मी शिवसेनेसोबत आहे. पस्तिस वर्षे एक झेंडा, एक विचार आणि एक शिवसेना आमची होती. आम्ही ठाकरेंना समजावून सांगितले की, एकनाथ शिंदेंना गमावू नका. आपले ज्याच्यांशी लफडे होते त्यांना समजवा आणि पुन्हा एकत्र या. आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा प्रश्न त्यांनी विचारला.

तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. तो म्हणजे अब्दुल सत्तार. सत्तार हे जसे बोलण्यात हुशात आहेत तसेच काम करण्यात हुशार आहेत. मी नंबर 33 ला होतो. तीर्री पे तीर्री. हे लोकं गेल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांकडं गेलो. लोकं आमच्याविरोधात बोलतात. आमच्यावर टीका करतात. सत्तार साहेब तर बऱ्याच पक्षात गेले. पण, ते निवडून आले. ते तर कलाकार आहेत, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.