Gulabrao Patil । 50 कोटी कोणत्या गाडीत आणले ते दाखवा; गुलाबराव पाटील यांचा सवाल

Gulabrao Patil । औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मात्र हे सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत आहेत. आज सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित सभा होती. या सभेला कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या तीन मंत्र्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. या सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान भाषण करत चौफेर फटकेबाजी केली.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. आता या आरोपावर आज पाटलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिल आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा प्रश्न त्यांनी विचारला.

तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. तो म्हणजे अब्दुल सत्तार. सत्तार हे जसे बोलण्यात हुशात आहेत तसेच काम करण्यात हुशार आहेत. मी नंबर 33 ला होतो. तीर्री पे तीर्री. हे लोकं गेल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांकडं गेलो. लोकं आमच्याविरोधात बोलतात. आमच्यावर टीका करतात. सत्तार साहेब तर बऱ्याच पक्षात गेले. पण, ते निवडून आले. ते तर कलाकार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.