Gunaratn Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा ; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फेकली काळी पावडर

Gunaratn Sadavarte |  सोलापूर : सोलापूरात गुणरत्न सदावर्ते (Gunaratn Sadavarte) यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते  यांच्या अंगावर काळी पावडर फेकली आहे. सोलापूरात ते पत्रकार परिषद घेत होते. यावेळी हा प्रकार घडला. या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही असं सदावर्ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत सीमा प्रश्नावर बोलत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडले. मात्र, त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून काळी पावडर काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. सोमनाथ राऊत असं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.

सदावर्तेंनी मराठा आरक्षणालाही विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा जाहीर निषेध’ अशीही घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेतील राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार (Sharad Pawar) , संजय राऊत (Sanjay Raut), बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.