Gunratna Sadavarte | “शरद पवारांनीच फडणवीसांच्या अटकेचा कट रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

Gunratna Sadavarte | मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. पण आता वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे.

“देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचना होता” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सदावर्ते हे माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

“दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून काल ‘कट’ असा एक शब्द निघाला. त्या शब्दाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्या अटकेनंतर एक श्रृंखला सुरू झाली. पोलिसांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. अटकेनंतर ते माझ्या लक्षात आलं”, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“आरोपी गुन्हेगार गुन्हा करतो. मात्र, एकतरी पुरावा सोडून जातो. गावदेवी पोलीस ठाण्यातील एक हार्डीस्क आहे, ती एकदोन दिवसांची नाही, त्यात दोन वर्षांचं रेकॉर्डींग आहे. ती आणा, कोल्हापुरातील फुटेज आणा, त्यातून हा कट कशाप्रकारे रचण्यात आला होता, हे लक्षात येईल, असेही ते म्हणाले. या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत”, आरोपही गुणरत्न सदावर्ते केला आहे.

“निनोटपाल यांची डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते निनोटपाल वारंवार मला लॉकअपमधून बाहेर काढत होते. मला एका ठिकाणी बसवलं जायचं आणि जी चर्चा केली जात होती, ती शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची कमी आणि इतर गोष्टींची जास्त जात होती. नागपूर, आरएसएस, राईटविंग आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच मुद्द्यांभोवती तपास फिरवला जात होता. मी त्यांना सांगत होतो, तुमचा तपास चुकीचा सुरू आहे. मात्र, कसंही करून त्यांना आम्हाला अडकवायचं होतो”, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

“हा कट कुठं रचला गेला मला माहिती आहे. मला अटक झाल्यानंतर काही नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. संजय पांडे उसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. तिथेच हा कट रचण्यात आला. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला”, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच याप्रकरणी दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील आणि अजित पवारांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.