H3N2 | धक्कादायक! पुण्यात H3N2 विषाणूचे 15 दिवसात 46 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू; महापालिकेचे सतर्कतेचे आवाहन
H3N2 | पुणे : जगभरात सलग २-३ वर्षे कोरोनाने हाहाकार माजवला होता. या कोरोना काळात सर्वात जास्त जिवीत हानी झाली. त्यानंतर आजही कोरोना संपूर्ण नष्ट झालेला नाही. हा व्हायरस पूर्ण नष्ट होण्यापूर्वीच राज्यात आता H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) धोका वाढताना दिसत आहे. पुण्यात एका 67 वर्षांच्या व्यक्तीचा H3N2 सह comorbidity ने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत या विषाणूने 6 बळी घेतले आहेत.
16 दिवसांत नवे 46 रुग्ण | 46 new cases of H3N2 virus in 15 days, one death in Pune
जानेवारीपासून पुणे शहरात 162 तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार H3N2 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात H3N2 चा वेगाने फैलाव होत असून मार्चमध्येच म्हणजे गेल्या 16 दिवसात 46 रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत एकूण 162 रुग्णांची नोंद पुण्यात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 73 वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सतर्क झाले आहेत. रुग्णाचा बळी गेल्याने महापालिका हाय अलर्टवर दिसत आहे. कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे.
राज्यात H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस वाढला
देशात H3N2 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी तसंच मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं महत्त्वाचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. महाराष्ट्रात H3N2 व्हायरसाच फैलाव होतो आहे मात्र घाबरण्याचं काहीही कारण नाही असंही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात H3N2चे 162 पेक्षा जास्त रुग्ण
पिंपरी-चिंचवडने H3N2 रुग्णांवर उपचार करण्यासाठी 5 सरकारी रुग्णालयात खाटा राखीव ठेवल्या आहेत. या प्रत्येक रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पालिकेने दहा खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेने H3N2 रुग्णांच्या उपचारासाठी शहरात 250 खाटा राखून ठेवल्या आहेत.
“आम्ही नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात H3N2-संक्रमित रुग्णांसाठी 50 अलगाव खाटा राखून ठेवल्या आहेत. जुन्या बाणेर रुग्णालयात सुमारे 200 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास क्षमता वाढवता येईल”, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितलं आहे.
काय काळजी घ्याल?
गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क आवर्जून लावावा. आपले डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श करू नका. खोकला आल्यावर किंवा शिंक आल्यावर तोंडावर रूमाल ठेवा. अंगदुखी किंवा ताप आला तर पॅरासिटामोल घ्यावी. एकमेकांशी हात मिळवणं शक्यतो टाळावं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊन नये. अगदी शेजारी-शेजारी बसून खाऊ नये.
महत्वाच्या बातम्या-
- Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे
- Sanjay Raut | “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Budget Session 2023 | “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही, हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान”; विरोधी पक्षाची सरकारवर आगपाखड
- Eknath Shinde | ‘शेतकरी जगला तर राज्य जगेल’ अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे सरकार….”
- Big Breaking | महिलांसाठी आनंदाची बातमी; आजपासून एसटीने करा अर्ध्या तिकीट दराने प्रवास
Comments are closed.