सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपमधील ‘हा’ नेता; मुश्रीफांचा धक्कादायक खुलासा

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. अशातच आज किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. पाहणीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री यांच्यावर घोटाळ्याचा नवीन आरोप करणार आहेत.

यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापूरला चालले होते. परंतु सोमय्या कोल्हापूरात पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना कराडमध्ये रेल्वेमधून खाली उतरवलं आहे. तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये रेल्वेतून खाली उतरले. हसन मुश्रीफ आजारपणामुळे दवाखान्यात होते. यानंतर हसन मुश्रीफ पत्रकारांशी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं.

सोमय्या यांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांनी आपलं मतं मांडली आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या आरोपामागे भाजपचे षडयंत्र आहे. त्याचे आरोप खोटे व बिनबुडाचे असून त्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सूत्रधार आहे, असा खळबळजनक हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसंच, चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा