शरद पवार नसते तर, आयपीएल ही टी-२० स्पर्धा साकार झाली नसती : ललित मोदी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संपूर्ण मर्यादांचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये पार पडला आहे.

तसेच पुढे मुंबईत यानिमित्ताने व्हर्चुअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. तसेच या व्हर्च्युअल रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएल मधील पवारांच योगदान आणि आयपीएलची सुरवात याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी ललित मोदी म्हणाले, २००५-२००८ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष शरद पवार होते. शरद पवार नसते तर, आयपीएल ही टी-२० स्पर्धा साकार झाली नसती. अशा शब्दात मोदींनी खुलासा केला. तसेच पवारांचे राजकरणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी या सगळ्याच खेळांसाठी पवारांनी मोठे योगदान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा