“बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते, तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”: अरविंद सावंतांनी भाजपला लगावला टोला

“भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कुबड्यावर होता.आमची कुबडी आणि आमची शिडी घेऊन भाजपा महाराष्ट्रात वाढला. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बिणीनं भाजपाला शोधावं लागलं असतं. राज्यात भाजपाचा विस्तार शिवसेनेमुळे झाला. ही शिडी भाजपानं विसरणं म्हणजेच कृतघ्नपणा आहे,” असा टोला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे.

‘भाजपाची अवस्था म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे. सत्तेत येण्यासाठी शिवसेनेची बदनामी केली जातेय. बेळगावचा प्रश्न जिवंत राहिला तो शिवसेनेमुळेच. १०६ हुतात्मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी दिले. बेळगावसह महाराष्ट्रासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर पोरकटपणे बोलू नये. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात माजी मुख्यमंत्री प्रचाराला बेळगावात गेले होते. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आशिष शेलार यांना विकृती नव्हे तर विकार झाला आहे.” असा टोला अरविंद सांवत यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.

“देशात क्रांती घडत आहे. महाराष्ट्राने क्रांती घडवण्याला सुरुवात केली. गुडघ्याला बाशिंग बांधू नये. पंढरपूरचा निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यात तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने पहिला राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला,” असंही अरविंद सावंत यांनी भाजपाला बजावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.